Talegaon Dabhade : नगरपरिषदेपुढे पेच; 39 दिवसात 20 कोटींची करपट्टी वसूल करण्याचे टार्गेट

एमपीसी न्यूज – तळेगाव शहरातील मालमत्ता (Talegaon Dabhade) धारकांनी करांची रक्कम वेळेत भरली नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत अद्याप 20 कोटी रुपये थकबाकी झाली आहे. आर्थिक वर्ष संपायला अवघे 39 दिवस राहिले असून एवढ्या दिवसात 20 कोटींची करपट्टी नगरपरिषदेला वसूल करायची आहे. त्यामुळे ही वसुली नेमकी कशी करायची असा पेच प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

नगरपरिषदेच्या हद्दीत सुमारे 38 हजार मालमत्ता धारक आहेत. त्यांच्याकडून 33 कोटी 12 लाख 8 हजार 624 रुपये वसुली करावयाची आहे. मात्र, आतापर्यंतच्या दहा महिन्यात अवघी 38% टक्के वसुली झालेली आहे. तर पुढील 39 दिवसात सुमारे 20 कोटी रुपये वसुली करावी लागणार असल्याने प्रशासनासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.

Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणात थेट लंडन कनेक्शन; एमडी ड्रग्जची कुरकुंभमध्ये निर्मिती, सेवन लंडनमध्ये!

नगरपरिषद परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, करअधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, मालमत्ता व्यवस्थापक जयंत मदने यांचे मार्गदर्शनाखाली कडक वसुली मोहीम हाती घेऊनही केवळ मालमत्ताधारकच्या उदासीनतेमुळे भरणा अतिशय अल्प होत आहे. वसुली साठी नगरपरिषद प्रशासन मोठमोठ्या कठोर वसुलीच्या घोषणा करीत असून त्यांचा करदात्यावर काहीही परिणाम जाणवत नाही.

नगरपरिषदेने वसुलीसाठी एकुण 12 विभाग केलेले असून त्यासाठी प्रत्येक (Talegaon Dabhade) विभागात स्वतंत्र वसुली अधिकारी नेमले आहेत. आदेश गरुड, प्रविण माने, तुकाराम मोरमारे, वैशाली आडकर, मयुर ढिलोड, प्रविण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड हे अधिकारी वसुलीसाठी दररोज घरोघरी जात आहेत. तरीही काही मालमत्ताधारक दाद देत नाहीत.

नगर परिषद प्रशासनाने सप्टेंबर महिन्यातच सर्व मालमत्ताधारकाना कर वसुली बाबतच्या नोटीसा दिलेल्या असुनही वसुली मात्र मोठ्या प्रमाणात रखडली आहे. बिल मिळून 90 दिवस पूर्ण झाले आहेत. नगरपरिषदेच्या मालमत्ता नियमानुसार 2% व्याज आकारणी केली जात असल्याने मालमताधारक हे 2 टक्के व्याज घेतल्याबद्दल प्रशासनाबरोबर अकारण वाद घालत असतात.

कठोर आणि कडक कारवाई करण्यापूर्वी मालमत्ता धारकांनी आपला मालमत्ता कर पूर्ण भरावा असे आवाहन कर अधिकारी कल्याणी लाडे व करनिरीक्षक विजय शहाणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.