Talegaon Dabhade : शहराच्या विकासात दाभाडे घराण्याचे मोठे योगदान – रवींद्र दाभाडे

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळेगाव (Talegaon Dabhade) शहरामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याचे मोठे योगदान आहे, असे मत माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्र दाभाडे यांनी व्यक्त केले. प्रथम नगराध्यक्ष सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.नवीन होणाऱ्या नगरपरिषदेच्या इमारतीला सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांचे नाव द्यावे,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून आयोजित सन 1884 साली स्थापन झालेल्या या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना झालेल्या सभेत दाभाडे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे,माजी उपनगराध्यक्ष सत्तेंद्रराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे,याज्ञीसेनी राजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे,मुख्याधिकारी एन,के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कल्याणी लाडे,संतोष दाभाडे पाटील, सुनील दाभाडे,अशोक दाभाडे, निलेश दाभाडे,रूपाली दाभाडे,सविता दाभाडे,विजय शहाणे,सिद्धेश्वर महाजन,सुवर्णा काळे,सोनाली सासवडे,रोहित भोसले,प्रवीण माने,आदेश अनिल इंगळे,भास्कर वाघमारेसह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Talegaon Dabhade : नगरपरिषदेपुढे पेच; 39 दिवसात 20 कोटींची करपट्टी वसूल करण्याचे टार्गेट

यावेळी सरसेनापती दाभाडे घराण्याने तळेगाव, मावळ तालुका व जिल्ह्यासाठी दिलेल्या सामाजिक आर्थिक (Talegaon Dabhade) योगदानाची विस्तृत माहिती ॲड.रवींद्र दाभाडे यांनी दिली.  सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वाराच्या कमानीचे लोकार्पण सोहळा लवकर करावा अशी मागणी सत्येंद्रराजे दाभाडे यांनी केली. तर नव्याने उभारल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या इमारतीस प्रथम नगराध्यक्ष सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांचे नाव द्यावे असे निवेदन व सूचना वृषालीराजे दाभाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी स्वागत सूत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केली तर आभार मुख्याधिकारी एन के पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.