Vadgaon Maval : वडगाव येथे 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या (Vadgaon Maval) वाढदिवसानिमित्त वडगाव शहर भाजपच्या वतीने वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 112 वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करून वाहन धारकांना मोफत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. वाहनांमुळे वायू प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

वडगांव नगरपंचायतचे नगरसेवक आणि वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष,वडगांव शहराच्या वतीने बुधवार दि.21 रोजी चावडी चौक, वडगांव मावळ येथे दोन आणि तीन चाकी वाहनांसाठी मोफत वायू प्रदूषण चाचणी शिबीर ( PUC ) व प्रमाणपत्र वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 112 वाहन चालकांनी लाभ घेतला.

Talegaon Dabhade : शहराच्या विकासात दाभाडे घराण्याचे मोठे योगदान – रवींद्र दाभाडे

ज्येष्ठ नेते अरविंद पिंगळे,पंढरीनाथ भिलारे,सोमनाथ काळे,दीपक बवरे, प्रदीप बवरे,मा.नगरसेवक प्रवीण चव्हाण,ॲड.विजय जाधव, शामराव ढोरे,रवींद्र काकडे,भूषण मुथा, शंकर भोंडवे,रविंद्र म्हाळसकर,शहर सरचिटणीस मकरंद बवरे,सचिन ढोरे, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश म्हाळसकर,संचालक ॲड.अजित वहिले,मा.सरपंच नितीन कुडे,संभाजी म्हाळसकर,सुधाकर ढोरे,पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे,विजय सुराणा,बाळासाहेब भालेकर, गणेश विनोदे,रामदास वाडेकर,प्रशांत चव्हाण,संतोष ढोरे,हेमंत काकडे , शिवाजी असवले, इंद्रायणी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन नामदेव ढोरे, नंदकुमार जाधव,महेंद्र बा. म्हाळसकर,संतोष भालेराव,मनोज जाधव,मनोज पोफळे, गणेश भेगडे , महेंद्र अ.म्हाळसकर, संतोष म्हाळसकर,सतीश म्हाळसकर,सुरेंद्र बाफना,दीपक पवार,विकास पिंगळे, रिचा पिंगळे,श्लोक पिंगळे,वरद पिंगळे, सवानंद भालेकर,देवेश भालेकर आदी कार्यकर्ते,पदाधिकारी सदर उपक्रमास उपस्थित होते.

शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सर्व वाहन चालकांना PUC बद्दलची माहिती (Vadgaon Maval) व महत्व समजावून सांगितले. युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.