Job Info on Twitter : नोकरी संदर्भात माहिती मिळणार ट्विटरवर

एमपीसी न्यूज – ट्विटरने नवीन सेवा सुरु केली आहे. कंपन्यांना त्यांच्याकडे उपलब्ध ( Job Info on Twitter) असलेल्या नोकऱ्यांच्या पोस्ट ट्विटरवर ठेवता येणार आहेत. यामुळे आता लोकांना नोकरी संदर्भातील अलर्ट आणि माहिती ट्विटरवरून मिळणार आहे. सध्या नोकरी संदर्भात माहिती देणारा Linkedin हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.

ट्विटरकडून ज्या कंपन्या अथवा संस्थांनी व्हेरीफाईड ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व घेतले आहे, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. ट्विटरने @XHiring या अकाउंटवरून नव्या सुविधेबद्दल पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, एक्स हायरिंग बीटा, जे केवळ व्हेरिफाइड संस्थांसाठी आहे. वापरण्यासाठी ते अनलॉक करा. त्याच्या मदतीने, संस्था त्यांच्या महत्त्वाच्या पदांसाठी लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

https://twitter.com/XHiring/status/1695154429828247798?s=20

ट्विटरवर व्हेरीफाईड ऑर्गनायझेशनचा टॅग मिळविण्यासाठी त्याचे अधिकृत सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. यासाठी खातेधारकास प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मोजावी लागते. त्यानंतर त्यांना ट्विटरकडून टिक मिळते. एखाद्या कंपनीने हे सबस्क्रिप्शन घेतल्यास त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची खाती देखील सलंग्न आणि सत्यापित केली जाऊ ( Job Info on Twitter) शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.