Nigdi : मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती ही एकमेव संस्कृती  आहे – डॉ.संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज – मन प्रसन्न करणारी सनातन हिंदू ही (Nigdi) एकमेव संस्कृती  आहे.  या संस्कृतीला संस्थापक नाही. ठरवून दिलेला एक धर्मग्रंथ नाही. वर्षानुवर्षे धर्म ग्रंथावर अनेकजण आपली मते मांडताना. नवीन पुस्तके काढतात. असे अन्न संस्कृतीत होत नाही. त्यामुळे बदलत्या जगानुसार बदलणारी हिंदू सनातन संस्कृती आहे. मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती एकमेव असल्याचे मत डॉ.संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.

श्री समर्थ युवक प्रतिष्ठान व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित… ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाला नागरिकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर समर्पक, अचूक भाष्य करत, कविता सादर करत प्राधिकरणवासीयांचे मन डॉ. उपाध्ये यांनी प्रसन्न केले. निगडीतील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक, पवना सहकारी बँकेचे संचालक अमित राजेंद्र गावडे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर आदी उपस्थित होते.

Ravet : नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत वैशाली भांडारकर प्रथम

डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, समोरच्याचे मन दुखवायचे नाही. लोक साहित्य, कलेची निर्मिती भारतात प्रामुख्याने ज्ञान आणि प्रबोधन अशा दोन्ही मनोरंजनाच्या माध्यमातून व्हावी. किंवा यापैकी एक तरी व्हायला हवी. केवळ मनोरंजन ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. भारताची नाही.  राजकारणामुळे महाराष्ट्र भारतभर गाजत आहे. हा प्रत्येकाच्या मनाचा परिणाम आहे. कोणाचे मन कोठे धावेल हे कळत नाही. सध्याचे राजकारण म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे हिंदू एकत्र आले. आणखी काय हवे आहे. मन प्रसन्न करणारी एकमेव संस्कृती आहे. ती म्हणजे सनातन हिंदू संस्कृती आहे.

अमित गावडे यांच्या कार्याला समाजकारणाची जोड…

निरागस आणि प्रामाणिक चेहऱ्याचा नगरसेवक मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला. अमित गावडे यांचे राजकारणाव्यतिरिक्त काम आहे. त्यांच्या कार्याला समाजकारणाची मोठी जोड असल्याचे गौरवोद्गार डॉ.उपाध्ये यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अमित राजेंद्र गावडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले. तर, अर्चना वर्टीकर यांनी (Nigdi) आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.