Elon Musk Takeover Twitter : एलाॅन मस्क यांची इच्छापूर्ती! 44 अब्ज डाॅलरचा करार करून बनले ट्विटरचे मालक

एमपीसी न्यूज – टेस्ला कंपनीचे सीइओ एलाॅन मस्क आता ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. तब्बल 44 अब्ज डाॅलरचा करार करत मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबतची चर्चा चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

इलेक्ट्राॅनिक कारचे प्रणेते एलाॅन मस्क हे सोशल मीडियावर सुद्धा चांगलेच सक्रीय आहेत. त्यांचा हा सक्रिय सहभाग दरवेळीच चर्चेचा विषय ठरत असतो. मध्यंतरी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ट्विटर कंपनीच विकत घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, मस्क यांनी ट्विटर बोर्ड समोर याबाबत ऑफर ठेवली आणि अखेर ट्विटर बोर्डने सोमवार अखेरपर्यंत या ऑफरला दुजोरा देत ही ऑफर स्वीकारली.

 

या कराराची पुष्टी एलाॅन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली असून हा करार एकूण 44 अब्ज डॉलरचा झाला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. काही काळापासून एलाॅन मस्क ट्विटरचे शेअर खरेदी करण्यात खूप सक्रीय दिसून येत होते आणि त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे थेट ट्विटर बोर्डकडे ट्विटर विकत घेण्याची ऑफरच दिली.

या साऱ्या प्रक्रियेदरम्यान मस्क म्हणाले, ट्विटरच्या वाढीसाठी आता प्रचंड संधी आहे. मजकुरावरील निर्बंध उठवणं आणि फेक अकाऊंट्सवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या करारावरील अंतिम निर्णयासाठी ट्विटर बोर्ड शेअर होल्डर्सना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.