Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रा याने रचला पुन्हा विक्रम; सुवर्णपदकाची हुलकावणी

एमपीसी न्यूज – ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पुन्हा धमाकेदार कामगिरी करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. फिनलॅंड येथील स्पर्धेत 89.30 मीटर अंतरापर्यंत भाला फेक करून नीरज चोप्राने ऑलिम्पिकमधील रेकाॅर्डलासुद्धा मागे टाकले. दरम्यान, यावेळी मात्र चोप्राला सुवर्णपदकापर्यंत पोहचण्यास अपयश आले असून रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे. 

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) एक नवा इतिहास रचून भारताचा तिरंगा गर्वाने फडकविला होता. या अतुलनीय कामगिरीनंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेच्या साधारण दहा महिन्यांनंतर नीरज चोप्रा फिनलॅंड येथे पार पडणाऱ्या नुरमी गेम्समध्ये सहभागी झाला.

Free Acupressure Camp : मोफत ॲक्युप्रेशर शिबिराचा 600 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

या स्पर्धेत नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पहिल्या प्रयत्नात 86.92 मीटर थ्रो केला, दुसऱ्या प्रयत्नात 89.30 मीटर थ्रो केला आणि आपला राष्ट्रीय विक्रम त्याने मोडला; मात्र तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात मात्र 85.85 मीटर इतकाच थ्रो केला त्यामुळे यावेळी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, फिनलॅंड येथील नुरमी गेम्सच्या भालाफेक स्पर्धेत ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या स्पर्धकाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हेलँडर याने 89.83 मीटर भाला फेक करून आपले सुवर्णपदकावरील नाव निश्चित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.