Free Acupressure Camp : मोफत ॲक्युप्रेशर शिबिराचा 600 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था आयोजित मोफत ॲक्युप्रेशर थेरपी (Free Acupressure Camp)  शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिराचा 600 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

पिंपरी येथील माजी नगरसेवक श्री संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हेल्थ व्हॅल्यू संस्थेच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक संस्था सभागृहांमध्ये दिनांक 8 ते 14 जून पर्यंत मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचे (Free Acupressure Camp)  आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ज्येष्ठ नागरिक व महिलांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला. जवळपास 600 हून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक संस्था व जेष्ठ नागरिक संघ यांना ॲक्युप्रेशर थेरपी मशीन भेट स्वरूपात देण्यात आली.

Pimpri News : सुरक्षा ठेव म्हणून 4 लाख अदा करा, महावितरणचे महापालिकेला पत्र

या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष धुंड्या स्वामी, कार्याध्यक्ष सुधाकर यादव, सचिव अशोक कुदळे, गुलाबराव सोनवणे, वसंत तावरे, सामाजिक कार्यकर्त्या रंजना जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.