Pimpri News : सुरक्षा ठेव म्हणून 4 लाख अदा करा, महावितरणचे महापालिकेला पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसह रूग्णालये, महापालिका शाळेच्या इमारतींसाठी सुरक्षा ठेव म्हणून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने (महावितरण) महापालिकेकडून 4 लाख रुपयांची मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील विविध भागात सुमारे साडेनऊशे मिळकती आहेत. यामध्ये लहान-मोठी रूग्णालय, शाळा, क्षेत्रीय कार्यालये, नाट्यगृहे, भाजी मंडई, व्यावसायिक गाळे अशा मिळकतींचा समावेश आहे. जन कल्याणासाठी किंवा जनसेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतींना आतापर्यंत महावितरणने कधीही सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठविले नव्हते.

Hemangi Kavi Post : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…” अभिनेत्री हेमांगी कवीने वटपोर्णिमेनिमित्त केली खास पोस्ट

महापालिकेच्या व्यावसायिक असलेल्या मिळकतींकडून सुरक्षा ठेव म्हणून महावितरणला पैसे अदा केले जातात. मात्र, तोट्यात असलेल्या महावितरणने आता महापालिकेच्या जन कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतींनाही सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठविण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीला तब्बल 3 लाख 97 हजार 700 रूपयांचे सुरक्षा ठेवीचे बिल मे महिन्यात पाठविले आहे.

महापालिका बिले अदा करणार नाही

विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संदेश चव्हाण म्हणाले, ”महापालिकेची इमारत, शाळा, रूग्णालये जन कल्याण, जनसेवेसाठी वापरण्यात येतात. आतापर्यंत अशा इमारतींना कधीही महावितरणने सुरक्षा ठेव म्हणून बिल पाठविले नव्हते. यावेळेस प्रथमच महावितरणने सुरक्षा ठेवीसंदर्भात बिले पाठविली आहे. मात्र, महापालिका ही बिले अदा करणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.