Chinchwad : तारांगण प्रकल्पाचे काम पूर्ण, उद्‌घाटनाची प्रतिक्षा

एमपीसी न्यूज – आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, (Chinchwad) वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या “हायब्रीड कॉन्फिग्रेशन सिस्टमद्वारे’ प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळणे शक्‍य होणार आहे. तसेच खगोल शास्त्रातील शिक्षक व विद्यार्थी यांना खगोलशास्त्राची सर्व माहिती या तारांगण प्रणालीच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. या प्रणालीचे सर्व काम पूर्ण झाले असून उद्‌घाटनाची प्रतिक्षा आहे. तारांगण प्रणालीचा पुणे जिल्ह्यामधील हा पहिलाच प्रकल्प आहे.

खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अनेकांना आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदींविषयी मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे. अनेकजण खगोलशास्त्राचा अभ्यास करत आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरिकांना खगोलशास्त्राची इत्यंभूत माहिती मिळावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे चिंचवड येथील सायन्स पार्कच्या बाजूलाच तारांगण प्रकल्प उभारला आहे.

तारांगण प्रकल्पाविषयी माहिती देताना महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्‍यामसुंदर बनसोडे म्हणाले, तारांगण प्रकल्पात 15 मीटर व्यासाचा एक अर्धगोलाकृती डोम (ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल) उभारण्यात आला आहे.

या डोमच्या माध्यमातून आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, (Chinchwad) वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष पाहता येणार असून आकाश दर्शन करत असल्याचा नागरिकांना अनुभव येणार आहे.

एकाचवेळी 120 नागरिक हे डोम पाहू शकतात. याठिकाणी दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी एक 180 आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे.

Pune : मध्यरात्री लुटले तरुणाला; आरटीआय कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि पोलिसांनी घेतली तातडीने दखल

दहा महिन्यांपासून उद्‌घाटन रखडले!

या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जून 2022 मध्येच उद्‌घाटन करण्यात येणार होते. मात्र, काही कारणास्तव पवार यांचा शहर दौरा रद्द झाला आणि या प्रकल्पाचे उद्‌घाटन रेंगाळले आहे.

राज्यात झालेल्या सत्ताबदलाला दहा महिने उलटून गेले. तरी, उद्घाटनाला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. शाळांना सुट्या लागल्या असून विद्यार्थ्यांना तारांगण बघता येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.