Khopoli Bus Accident : ढोल ताशा पथकाच्या बसला भीषण अपघात; खंडाळा घाटात बस दरीत कोसळली, बारा जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (PuneKhopoli Bus Accident) ढोल ताशा पथकाच्या तरुणांना घेऊन मुंबईच्या दिशेला प्रवास करणारी बस खोल दरीत कोसळली. पहाटे चारच्या सुमारास खंडाळा ते खोपोली दरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खंडाळा घाट उतरताना शिंग्रोबा मंदिराजवळ ही बस दरीत कोसळली आहे. बारा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर 17 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. 

मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील तरुण या खाजगी बसमधून प्रवास करत होते. यामध्ये 20-22 वर्षांच्या तरुणांचा समावेश आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला.

या खाजगी बसमध्ये मुंबई येथील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गटाचे (झांज पथक) तरुण प्रवास करत होते. पिंपरी चिंचवड येथून कार्यक्रम संपवून ते गोरेगाव येथे जात होते. या बसमध्ये 40 ते 45 तरुण प्रवास करत होते. वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हंटले आहे.

बस दरीत कोसळल्यावर बसच्या वरील पत्रा तुटून पडला. यामुळे आतील तरुण प्रवासी बाहेर पडून दरीतील मोठया दगडांवर आपटले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती दर्शवली जात आहे.

अपघाताची माहिती समजताच बोर घाट पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू पथक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था ,
आपदा मित्र मावळची टिम, खोपोलीतील (Khopoli Bus Accident) अनेक रुग्णवाहिका व नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले असून दरीत जखमी प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Pune : शिरुर तालुक्यात होणार 329 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.