Today’s Horoscope 15 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 April 2023
वार – शनिवार.
15.04.2023
शुभाशुभ विचार – 10 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – श्रवण 07.36 पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर 18.44 पर्यंत नंतर कुंभ.
———————————
मेष  ( शुभ रंग- मोरपंखी )
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी )
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्न ना यश नक्कीच मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. आज घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी )
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत, स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवूच नका विश्वासातील व्यक्तींकडूनही विश्वासघात होण्याची शक्यता आहे.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.

सिंह (शुभ रंग- पांढरा )
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही यांनी असतील तर ती अनपेक्षित पणे वसूल होण्याची शक्यता आहे.

कन्या ( शुभ रंग- मरून)
हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळ ही तुम्ही खर्च कराल. गुढ शास्त्राच्या अभ्यासकांना आज एखादी प्रचिती येऊ शकते.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहिणींना मुलांच्या अभ्यासातही लक्ष घालावे लागणार आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल.

वृश्चिक (शुभ रंग- मोतिया)
आज नोकरदारांना बढती, बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा आज करू नये.

धनु (शुभ रंग- जांभळा)
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुम्ही आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे आज घरी पायधुळ झाडतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून संवाद साधावा.

मकर ( शुभ रंग- भगवा )
आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच राहिलेले बरे.

कुंभ (शुभ रंग – क्रीम) – Today’s Horoscope 15 April 2023
संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे. मनसोक्त खर्च कराल आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल वाद मात्र टाळा.

मीन (शुभ रंग – हिरवा )
कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील तुमच्यासाठी आज स्वप्नपूर्तीचा दिवस असून जसे चिंताल तसेच होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune : ढोल ताशा पथकाच्या बसला भीषण अपघात; खंडाळा घाटात बस दरीत कोसळली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.