Chinchwad : शाहूनगर येथील जी ब्लॉकमधील इमारतींना पूर्णत्वाचा दाखला द्या; अमित गोरखे यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील जी ब्लॉक ( Chinchwad) शाहूनगर ,संभाजीनगर मधील रहिवाशी इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्याची मागणी भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी उद्योगमंत्री  उदय सामंत यांच्याकडे केली.

Pune : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा होणार

संभाजीनगर, शाहूनगर परिसरात जी ब्लॉक मध्ये अनेक इमारतींना अनेक वर्षापासून पूर्णत्वाचा दाखला देण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी गोरखे यांनी संभाजीनगर शाहूनगर मधील नागरिकांसमवेत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुधारित विकास नियंत्रण नियमावली-2009 मधिल नियम क्र.30 (iv) नुसार इमारतीतील सज्जा या मधिल भिंत तोडून सज्जाचे क्षेत्र खोली मधे समाविष्ट करण्याकरिता महामंडळ ठरविल्यानुसार अधिमुल्य आकारुन परवानगी देण्याची तरतूद आहे.

त्या ठरवानुसार इमारतीतील सज्जा प्रत्येक चौ.मी.साठी रहिवाशी वापरण्या करिता रहिवाशी दराने आकारुन त्याचे पत्रक काढण्यात आले आहे. 2017 मध्ये संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात इमारतीचे नकाशे मंजुरी इमारत पूर्णत्व दाखल्या बाबतचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) यांना देण्यात आले.

ऑनलाइन सिस्टीम बदला प्रमाणे सज्जा बंदिस्त करुन पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत आहे. या एसपीएस पातळीवर ऑनलाइन प्रणाली मधे पूर्वी प्रमाणे बदल करण्यात यावा. तसेच इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळणे कमी विशेष बैठक लाऊन आदेश काढावेत अशी मागणी करण्यात ( Chinchwad) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.