Chinchwad News : शॉर्ट सर्कीटमुळे फ्लॅटमध्ये आग

एमपीसी न्यूज –  चिंचवड लिंक रोडवरील देवी लिंक (Chinchwad News) सोसायटी मधील राजा चौधरी यांच्या फ्लॅटला शनिवारी (दि.4) रात्री दहाच्या सुमारास आग लागली होती. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे समोर आले आहे. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

पिंपरी येथील अग्निशम नियंत्रण कक्षाला याची वर्दी मिळताच थेरगाव व पिंपरी फायरस्टेशनच्या अशा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याहोत्या तासाभराच्या प्रयत्नानंतर आग पुर्णपणे आटोक्यात आणली गेली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

 

Khed News : शिवयोगी आश्रमात दुष्काळ-पूर मुक्ती शिबाराचे आयोजन

ही कामगिरी अग्निशमनदलाचे गौतम इंगोले, अर्जून जाधव (चालक), महेंद्र पाठक, संभाजी दराडे, ऋतिक पिंपळे, योगेश कुंभार, सतीश राठोड,राहूल जाधव, निकेतन पवार, रोहीत सुरवसे, दादासाहेब वाघमोडे,दिनेश पाठककर (Chinchwad News) व अमोल शिरोळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.