Khed News : शिवयोगी आश्रमात दुष्काळ-पूर मुक्ती शिबाराचे आयोजन

एमपीसी न्यूज – खेड जवळील पाडळी मधील शिवयोग (Khed News) आश्रमात चला जाणूया नदीला अंतर्गत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्रातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. 
काल  दुष्काळ  पूर मुक्ती प्रशिक्षण शिबीर आयोजन करून संबंधित विषयाची पार्श्वभूमी, उद्देश यावर माहिती दिली.नदी बाबतीत, वृक्षा रोपण , वृक्ष संवर्धन, मनुष्य रोजच्या जीवनातील घडामोडी ,समस्या, कार्य तसेच क्रीडा क्षेत्रातील खेळ याची उदाहरण देत नागरिकांशी आपले पणाने संवाद साधत नदी स्वच्छता जनजागृतीबाबतीसह दुष्काळ पूर मुक्त जगासाठी  नावीन्य पूर्ण मॉडेल याविषयी येथे माहिती देण्यात आली.

हे शिबीर 4 मार्च ते 6 मार्च पर्यंत येथे आयोजित केले असून याचे प्रशिक्षक राजेंद्र सिंह जलपुरुष,संजय सिंह,उज्ज्वल कुमार,इंद्रजित देशमुख हे आहेत.शिबिराचे आयोजक नरेंद्र चुग आहेत. याबाबतची माहिती (Khed News) इंद्रायणी फाउंडेशनचे विठ्ठल  शिंदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.