Pune News : मुंबई-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, ट्रक मध्ये अडकलेल्या दोघांची सुटका

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर महामार्गावर सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर आज (रविवारी) सकाळी साडे सहाच्या सुमारास दोन (Pune News) मालवाहू ट्रकचा अपघात झाला. यावेळी दोघे जण हे ट्रकमध्ये अडकून पडले होते त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे.

या अपघाताची पुणे अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला वर्दी मिळताच तातडीने पाषाण अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. दत्तू आंबू गोळे ( वय 60) व सुरज सुर्वे ( वय 30) अशी यांची नावे असून हे सातारा येथील रहिवासी आहेत.

 

Chakan News : चाकण घाटातील आगींमुळे वनक्षेत्रातील प्राण्यांचे जीव धोक्यात

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणारया मार्गावर मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वाहन चालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकले होते.

 

दोघे जखमी अवस्थेत असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा (बोल्ड कटर, स्पेडर, डोअर ब्रेकर, कटावणी,रश्शी इत्यादी) वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन ही जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

 

हि कामगिरी अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान औंकार देशमुख, विकास कुटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.