Today’s Horoscope 24 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 24 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 24.04.2024.

शुभाशुभ विचार – वृद्धितीथी.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – स्वाती 24.41 पर्यंत नंतर विशाखा.

चंद्र राशी – तुळ.

—————————–

मेष ( शुभ रंग- भगवा)

आज नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती सकारात्मकतेने पार पडतील. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील. व्यवसायात भागीदारांमध्ये एकमत राहील.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)

ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमां शिवाय दुसरा पर्याय नाही. आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ लाभेल.

मिथुन (शुभ रंग – सोनेरी)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोपत राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी) 

आज तुम्हाला काही घरगुती कामात लक्ष घालणं गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी आज सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

सिंह ( शुभ रंग- आकाशी)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा आईच्या आज्ञेत राहा.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

तूळ (शुभ रंग- लाल)

आज अति उत्साहाने तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल उपवरांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडणार आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- राखाडी) 

दिवस खर्चाचा असल्याने बचत शक्य नाही. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. अनावश्यक खरेदी कराल. प्रवासात एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

धनु (शुभ रंग- गुलाबी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र दिलेले शब्द पाळतील. दिवसाच्या पूर्वार्धातच लाभ होईल.

मकर (शुभ रंग- निळा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात प्रगतीची चक्रे गतिमान राहतील. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.

कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

मीन   ( शुभ रंग- पांढरा)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणतेही गैरवर्तन टाळा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.