Chakan News : चाकण घाटातील आगींमुळे वनक्षेत्रातील प्राण्यांचे जीव धोक्यात

एमपीसी न्यूज – सद्यस्थितीत केळगाव, चऱ्होली खुर्द,चाकण हद्दीतील डोंगराळ भागात,वनक्षेत्रात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर (Chakan News) घडत आहे. यामुळे वनक्षेत्रातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वनक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सरपडणाऱ्या प्राण्यांसह  इतर वन्य प्राण्यांच्या , हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. काल (दि.4) दुपारी 12 च्या सुमारास चाकणघाट परिसरात डोंगराळ भाग वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

त्या आगीकडे  संध्याकाळ पर्यंत  कोणाचे ही लक्ष दिसून आले नाही. चाकण घाट परिसर,वडगांव घाट (चऱ्होली खुर्द) परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. तोच कचरा काही समाजकंटक पेटवतात. ती पेटलेली आग सुध्दा वनक्षेत्रात जात असल्याचे चित्र उन्हाळ्यात दिसून येते. त्याकडे वन विभागाने पूर्ण लक्ष वेधले पाहिजे.

वनक्षेत्रात कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे. तसेच ठिकठिकाणी चाकण घाटातील
वनक्षेत्रात लागलेल्या आगी मुळे अनेक वृक्षांचे नुकसान होऊन अनेक सरपटणारे प्राणी इ. वन्यजीव ही त्यात मृत्यू पावले असतील. पुढे येथील वनक्षेत्रात कचऱ्या मुळे आगीच्या घटना घडू नये यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात वनक्षेत्रात वणवा लागल्यावर तो वणवा कसा लवकर विझेल ,आटोक्यात (Chakan News) येईल यासाठी शासनाने योग्य अशा उपाय योजना तेथे करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.