Chinchwad : अर्धांगवायू ग्रस्त कोल्हे यांचा आधार बनली मातृसेवा सेवाभावी संस्था

एमपीसी न्यूज – जगी ज्यास कोणी नाही (Chinchwad) त्यास देव आहे…या उक्तीप्रमाणे मातृसेवा सेवभावी संस्था अजय कोल्हे यांच्या पाठीशी उभी राहीली आहे. घरच्यांनी सोडलेली साथ अन दुर्धर आजार यातून बाहेर पडण्यासाठी मातृसेवा सेवाभावी संस्था आजही कोल्हे यांच्या साथीने उभे रहात आहेत.

 

नाशिक येथील संगमनेर येथील 52 वर्षीय अजय प्रेमानंद कोल्हे हे अर्धांगवायू पिडीत आहेत. त्यांचा एक हात पुर्णपणे निकामी झालेला आहेत. अशा परिस्थितीत स्वतःच्या पत्नीने सांभाळण्यास नकार दिला. त्यावेळी कोल्हे यांची बहिण सुनंदा  यांनी त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घेतली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळच होते. कोल्हे यांच्या बहिणीला ही आजारपण जडले दोनीही मुत्रपिंड निकामी झाले, त्यामुळे त्यांना ही डायलिसीस चे नियमीत उपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्वतःचा खर्च व भावाची जबाबदारी पेलणे कठीण जात होते.

Maval : धामणे गावात पद्मावती देवीच्या उत्सवास सुरुवात

हि बाब लोणावळा शहरचे सहायक पोलीस निरीक्षक व सामाजिक कार्यकर्ते बन्सी कांबळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याप्रकरणी चिंचवड येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक सुहास गोडसे व सीईओ संस्कृती गोडसे यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी आधार सामाजिक संस्थेला बरोबर घेऊन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली. त्यानंतर मातृसेवा सेवाभावी संस्थेत त्यांच्या निवास, भोजन व उपचाराची सोय करण्यात आली. तेंव्हा पासून कोल्हे यांच्या प्रकृती मध्येही हळूहलू सुधार होत आहे. त्यामुळे कोल्हे यांची सुनंदा गायकवाड यांच्याही डोक्यावरचा भार कमी झाला.

 

या परोपकारी कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्र प्रचार प्रसार प्रसिद्धीप्रमुख राजाभाऊ भिलारे, भोसरी विधानसभा समन्वयक प्रमुख गणेश भालेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, संस्कृती गोडसे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

 

यावेळी बन्सी कांबळे यांनी या कार्याबद्दल मातृसेवाभावी संस्थेचे आभार मानले. कोणताही आधार नसताना जेमतेम खर्चात कोणताही गाजावाजा न करता मातृसेवा सेवाभावी संस्था काम करत आहे हे खरच कौतुकास्पद आहे. यावेळी मातृसेवा ही कोल्हे यांच्या प्रकृतीतील सुधार व संस्कृती गोडसे सारख्या आत्मविश्वासू मुलीचा (Chinchwad) हसरा चेहरा हीच मातृसेवा सेवाभावी संस्थेची खरी कमाई आहे. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.