Pune News : माजी नगरसेवकाकडे 20 लाखांची खंडणी मागणारा तोतया पोलीस गजाआड  

एमपीसी न्यूज – मुंबई येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी (Pune News)असल्याची बतावणी करून पुण्यातील भाजपाच्या माजी नगरसेवकाकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकाने फिर्याद दिली होती.

Chinchwad : अर्धांगवायू ग्रस्त कोल्हे यांचा आधार बनली मातृसेवा सेवाभावी संस्था

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने  काही दिवसांपूर्वी पुणे कॅन्टोन्मेंटच्या माजी नगरसेवकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. तुमच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करतो. मी मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त आहे, असे बतावणी त्यांनी केली.या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास करण्यात येत होता.

कांबळे ससून रुग्णालयाच्या परिसरात थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी मोहसीन शेख आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. अटक आरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डॉक्टर पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून वीसहून अधिक खंडणीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हि कारवाई पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, संजय जाधव, मोहसीन शेख, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार, नागनाथ राख (Pune News)आदींनी ही कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.