IPL 2023 : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज कडून पराभूत; रहाणेने मुंबईमध्ये दुनिया हलवली

एमपीसी न्यूज – शनिवारी रात्री 7 वाजता झालेल्या (IPL 2023 ) सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज ने मुंबई इंडियन्स ला 7 बळी आणि 11 चेंडू राखून निवांतपणे हरवले. मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर, घरेलु प्रेक्षकांसमोर मुंबई इंडियन्सने स्वतःचा आयपीएल 2023 चा दुसरा सामना हरला. चेन्नईने मुंबईला हरवून आयपीएल 2023 मध्ये 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. कर्णधार एम एस धोनीने काल संघामध्ये बेन स्टोक्स आणि मोईन आली यांना बाहेर ठेवून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. नाणेफेक जिंकून सीएसके ने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 

पहिली फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशन किशन ने मुंबईला ताबडतोब सुरुवात दिली. रोहित शर्मा (21) आणि इशन किशन (32) यांचा तुफानी सुरवाती नंतर ते दोघे पॉवर प्ले मध्येच बाद झाले. त्यानंतर मुंबई इंडियन्स सामन्याचा बाहेरच राहिले. चेन्नई ने जसे स्वतःचे फिरकी गोलंदाज आणले, तसे मुंबई ढेपाळली.
तिलक वर्मा (22), टीम डेव्हिड (31) आणि ऋतिक शोकीन (18) यांनी चांगले कॅमियो दाखवत मुंबईला 157 च्या सन्मानजनक धवसांख्ये पर्यंत पोहचवले. चेन्नई कडून रवींद्र जडेजा ने 3 बळी तर तुषार देशपांडे आणि मिशेल सॅंटनर यांनी 2 बळी घेतले. आयपीएल 2023 चा पहिलाच सामना खेळणाऱ्या मगाला ने 1 बळी घेतला.

158 या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना देवान कोनवे हा धावा न काढताच बाद झाला. त्यानंतर आयपीएल 2023 चा पहिला सामना खेळणारा मुंबईच्या घरच्या मुलाने मुंबई ला सामन्यातून बाहेरच काढले. अजिंक्य रहाणेने 27 चेंदूनमध्ये 61 धावा काढल्या. तो बाद झाल्यावर आयपीएल 2023 मध्ये फॉर्म मध्ये असणारा पुण्याचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (40) आणि शिवम दुबे (28) याने चेन्नई ला पुढे नेले.

 

दुबे बाद झाल्यावर इंपॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अंबती रायुडू (20) ने चेन्नई चा विजयी फटका मारला. मुंबईकडून गोलंदाजी करताना बेहेरेन्डॉर्फ, पियूष चावला आणि इंपॅक्ट प्लेअर म्हणून आलेला कुमार कार्तिकेय या तिघांनी एक एक बळी घेतला. मुंबईला अजिंक्य रहाणे हा अभ्यासक्रमाच्या बाहेर आला असे  म्हणू  शकतो. मुंबई चा मोटो ‘ दुनिया हिला देंगे ‘ ला रहाणेने मनावर घेऊन मुंबईलाच हलवून टाकले.
मुंबईने स्वतःचे 2 पैकी 2 सामने हरले आहेत. कर्णधार रोहित शर्माला स्वतःच्या संघाची दुर्मिळ गोलंदाजी आणि खालच्या फळीची फलंदाजी सुधारण्यासाठी हात पाय चालवावे लागतील. चेन्नई सुपर किंगजना सुद्धा दुखापतींचा धक्का बसत आहे. म्हणून हे दोघे आयपीएल इतिहासातील यशस्वी कर्णधार पुढे काय (IPL 2023 ) करतात हे बघावे लागेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.