Pimpri : भर उन्हाळ्यात ऊन पावसाचा खेळ सुरू

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील परिसरात (दी.8) दिवसभर ढगाळ (Pimpri) वातावरण होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यापासून काही वेळ सुटका मिळाली. देहूगाव, इंद्रायणी, खालुम्ब्रे, या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. यापावसामुळे नागरिकांना थोड्या वेळासाठी उन्हापासून मुक्तता मिळाली.

IPL 2023 : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज कडून पराभूत; रहाणेने मुंबईमध्ये दुनिया हलवली

हवामान विभागाने सहा ते नऊ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच शहरात विविध भागात पाऊस पडला. मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

शहरात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाका वाढल्याने शहर परिसरातील नागरिक या वाढत्या उकाड्याने हैराण झाले होते. तसेच कधी उन्हाळा कधी हिवाळा वातावरणामुळे अनेकांना सर्दी ताप खोकला असे आजार होतात. अशा वातावरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
दोन दिवस ढगाळ वातावरण होते त्यामध्ये सकाळी दहा नंतर गरम उकाडा आणि दुपारी गार वारा, त्यानंतर संध्याकाळी सात नंतर हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी असे वातावरण अनुभवायला (Pimpri) मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.