Kondhwa : कोंढवा येथे आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या 9 जणांना अटक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सध्या आयपीएलच्या क्रिकेट (Kondhwa ) मॅच सुरु असून शनिवारी (दि.8) चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या 9 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या तपासी पथकाने अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी रात्री पावणे नऊ वाजता कोंढवा येथील ब्रम्हा अंगण या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी यश प्रताप मनोज कुमार सिंह (वय 22 वर्षे रा. मुक्काम पोस्ट मनकहिया तालुका मिर्झा मुराद जिल्हा वाराणसी राज्य उत्तर प्रदेश), धर्मेंद्र संगम लाल यादव (वय 25 रा. कुणबी यारा तालुका कर्जना जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश), रिगल चंद्रशेखर पटेल (वय 22 रा. मिर्झा मुराद जिल्हा वाराणसी राज्य उत्तर प्रदेश) अनुराग फुलचंद यादव (वय 25  रा.  कचना जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश),

Pimpri : भर उन्हाळ्यात ऊन पावसाचा खेळ सुरू

इंद्रजीत गोपाल मुजुमदार (वय 30 रा. गंगा आनंदपुर जिल्हा उत्तर 24 परगणा राज्य पश्चिम बंगाल) सतीश संतोष यादव (वय 19 रा. मुक्काम पोस्ट कोहडार तालुका मिजा जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश) अजिंक्य शामराव कोळेकर (वय 30 रा. नाना पेठ पुणे) हेमंत रवींद्र गांधी (वय 38 रा. रास्ता पेठ पुणे), सचिन सतीश घोडके (वय 45 रा. रास्ता पेठ पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

हे आरोपी सट्टा घेताना व पुढे लावताना पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच लोटस 365 या ऑनलाइन ॲपवर ग्राहकांना जुगार खेळण्यासाठी आयडी तयार करून देऊन त्या बदल्यात पैसे ऑनलाईन घेत होते. आरोपींकडून पोलिसांनी  18 मोबाईल हँडसेट, तीन लॅपटॉप,  एक मॉनिटर, एक सीपीयू, एक राऊटर व रोख 92 हजार रुपये असा एकूण 5 लाख 12 हजार- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे (Kondhwa )महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.