Pune : ऋतुराज गायकवाड उद्या अडकणार विवाहबंधनात; पुण्यात होणार विवाह

एमपीसी न्यूज – चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज (Pune) ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकतोय. त्याची होणारी पत्नी हि दुसरी कुणी नसून त्याचीच दीर्घकालीन मैत्रीण उत्कर्षा पवार आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा जोडीला एकत्र बघितले गेले. त्यांचा विवाह सोहळा हा उद्या दिनांक 3 जून रोजी पुण्यात होणार आहे.
विश्व टेस्ट चॅम्पियनशिपसाठी जेव्हा ऋतुराजने स्वतःला राखीव खेळाडू म्हणून अनुपलब्ध घोषित केले, तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. कोणत्याही खेळाडूसाठी ही मोठी संधी असते व या संधीचा कुठलाही खेळाडू पुरेपूर फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्याने या टेस्टसाठी वैयक्तिक कारण दिले तेव्हा सर्वांना समजले, की ऋतुराजने ही रजा स्वतःच्या लग्नसोहळ्यासाठी घेतली आहे.
Pune : मान्सून पुर्व पावसामुळे पुणे शहर परिसरात काल 25 झाडपडीच्या घटना
ऋतुराज गायकवाडची होणारी पत्नी ही सुद्धा क्रिकेटपटू असून ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळते. ऋतुराजने आयपीएल चषक जिंकल्यावर स्वतःच्या इन्स्टावर स्वतःचा, उत्कर्षा आणि सीएसके कर्णधार एम एस धोनी यांचा फोटो शेअर केला होता.
दोघांनीही (Pune ) स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबाबत सोशल मीडियावर जास्त माहिती दिलेली नसली तरीही त्यांचा विवाहाच्या आधीच्या मेहेंदीचे फोटो समोर आलेले आहेत. ऋतुराज आणि उत्कर्षाची नवीन जीवनामध्ये पार्टनरशिप उद्यापासून सुरु होत आहे. तमाम क्रिकेट चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.