Chinchwad : सांगड एकांकिकेची कोहिनूर राज्यस्तरीय करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड

एमपीसी न्यूज – मैत्रिणींनी त्यांच्या अनुभवातून साकारलेली(Chinchwad) सांगड ही एकांकिका राज्यस्तरीय कोहिनूर कंरडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवडली गेली आहे.

अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या 100व्या वर्षात, राम गणेश गडकरी स्मृती ‘कोहिनूर ‘करंडकसाठी होणाऱ्या स्पर्धेत ‘सांगड’ ही एकांकिका 2 फ्रेब्रुवारी रोजी चिंचवड रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे सादर केली जाणार आहे.

Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला 8 दिवसांची कोठडी

मिलींद खरात लिखीत आणि विजय कुलकर्णी (Chinchwad)दिग्दर्शीत ‘कलापिनी महिला’ मंचच्या गुणवंत कलाकारांनी आपल्या सशक्त अभिनयाने सादर केलेली एकांकिका काहीशी विचार करायला लावणारी, कधी हसवणारी तर कधी आपल्या मनाला हेलावून टाकणारी . सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.

आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक गोष्टींची सांगड घालत स्त्री चा प्रवास चालू राहातो. समाजाला मान्य असलेल्या चौकटीत राहून पूर्विच्या रुढी,परंपरा,रीतीरिवाज पुढे नेणारी स्त्री आणि तीच जुनी चौकट मोडून काहीतरी नवीन करु पाहणारी आजची आधुनिक विचाराची स्त्री .या दोहोंचा सुंदर मिलाप असलेली एकांकीका ‘सांगड’.जिमच्या निमित्याने एकाच सोसायटीतल्या सर्व वयोगटातील ,वेगवेगळ्या भाषीक असलेल्या मैत्रिणींनी एकत्र येवून नव्या जुन्या विचारांची सांगड घालत सादर केलेली ही एकांकिका सर्वच महिलांना आपल्या जवळची वाटणारी आहे.ही एकांकिका सर्वांनीच अवश्य पाहायला हवीच.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.