Chinchwad : ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह’ प्रतिबंधावर शनिवारी शाहूनगरमध्ये व्याख्यान

एमपीसी न्यूज – कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान आणि आधार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि.30) प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह’ प्रतिबंधावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

चिंचवड, शाहूनगर येथील कै. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. यावेळी अॅडॉर ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची महाराष्ट्रभर ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह’ प्रतिबंधावर व्याख्यान होत आहेत. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. डॉ. दीक्षित यांची महाराष्ट्र राज्याच्या स्थूलता विरोधी अभियानाच्या ब्रँड अँबेसिडरपदी नुकतीच निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह’ प्रतिबंधावर डॉ. दीक्षित यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.