Maval : पार्थ पवार यांनी घेतल्या पवन मावळातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी

पार्थ पवार यांचा पवन मावळात प्रचार दौरा

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी गुरुवारी (दि. २८) पवन मावळातील ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. बारामती सारखाच मावळचा विकास करणार असे त्यांनी आश्वासन दिले. शिवणे गावात पार्थ पवार, युगेंद्र पवार दोघा भावांनी बैल गाडीतून प्रवास करीत प्रचार केला.

पार्थ पवार यांनी पवन मावळातील सोमाटणे गावातून प्रचाराला सुरूवात केली. सोमाटणे, परंदवडी, धामणे, ऊर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, थुगाव, मळवंडी-ढोरे, शिवणे आदी गावातील शेतात जाऊन येथील शेतक-यांशी संवाद साधला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक किशोर भेगडे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, नगरसेवक संतोष भेगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

धामणे येथे बोलताना पार्थ म्हणाले, “कुठे नेवून ठेवला भारत माझा? हे म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. हे सरकार काय करतयं हे आपण सगळेच पाहतोय. भाजपा सरकार येण्याच्या आधी दीड लाख कोटी कर्ज महाराष्ट्रावर होतं ते आता 5 लाख कोटी झालं. तरुण बेरोजगार झाले आहेत. जेवढ्या नोकऱ्या येतात तेवढ्या सगळ्यांना बाहेरच्या लोकांना मिळतात. एका महिन्यात मावळ बदलून दाखवण्याचे काम करणार” असे त्यांनी आश्वास दिले.

यावेळी अरूण गराडे. दिलीप गराडे, काळूराम गराडे, सुरेश गराडे,रामनाथ गराडे,अविनाश गराडे, नंदकुमार गराडे,संदीप गराडे आदी उपस्थित होते.

ऊर्से येथील एका शेतात थांबुन शेतकरी महिलांशी संवाद साधला. शेतमालाला भाव मिळत नसून भाजपा सरकारमुळे आम्हाला शेतमाल कमी किंमतीत विकण्याची वेळ आली असल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली. आमच्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले असून देखील त्यांना नोकऱ्या नाहीत असे गार्हाणे मांडले. पवना रूग्णालयास भेट देत संवाद साधला व माहिती घेतली.यावेळी राकेश मु-हे,संतोष मु-हे विष्णू मु-हे,संतोष मु-हे, विशाल मु-हे व ग्रामस्थ उपस्थित होते.

परंदवडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे दर्शन घेऊन येथील ग्रामस्थ वसंत पापळ, शामराव भोते, भरत भोते, रमेश भोते, कुंदन भोते, संतोष भोते व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.