Talegaon Dabhade : संतोष खांडगे यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोशाळा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांना सामाजिक व शैक्षणिक कामातील योगदानाबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोशाळा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. बुट्टेवाडी(ता.खेड)येथील धर्मवीर संभाजी महाराज गोशाळा ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

आंबेगाव तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ .प.बाजीरावमहाराज बांगर आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊराव कुदळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन खांडगे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,सचिव मिलिंद शेलार ,सामाजिक कार्यकर्ते विलास टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष खांडगे हे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष असून श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, समाज प्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तर पवना विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचे ते अध्यक्ष आहेत. खांडगे हे अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, कला, क्रीडा, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून उल्लेखनीय समाजोपयोगी कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

पुरस्कार सोहळ्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे, पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, गोरक्षक मंगेश बडे, उद्योजक अजित लुणावत यांनाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोशाळा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.