CNG Pune : पुण्यात 1 नोव्हेंबरपासून सीएनजी पंप अनिश्चित काळासाठी बंद

एमपीसी न्यूज : पुण्यातील सीएनजी (CNG Pune) धारकांसाठी मोठी बातमी. सीएनजी पंपधारकांनी आपला नियोजित संप बंद पुढे ढकलला असून 1 नोव्हेंबरपासून सीएनजी पंप अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे. सीएनजी पंपांनी 20 ऑक्टोबरपासून बेमुदत CNG विक्री बंद कऱण्याचा इशारा दिला होता. मात्र, काही दिवसातच दिवाळी असल्याने कारण सांगत संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ravet : गाडीला बॉल लागला म्हणून खंडणीची मागणी करत मारहाण

पेट्रोल डिलर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत प्रलंबित थकबाकी ही व्याजासह डीलर्सच्या खात्यात जमा होत नाही तोवर CNG सेल बंद ठेवण्यात येणार आहे. आज टोरंट CNG संपाच्या मुद्द्यावर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी यांची बैठक पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.