Madan Gadkari : मैफिलीचा माणूस हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य दिग्दर्शक मदन गडकरी (Madan Gadkari) यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विदर्भात प्रायोगिक रंगभूमीला स्थान मिळवून दिले.

Pune : वैभवशाली साहित्याचा नवोदितांनी शोध घ्यावा – प्रा. तुकाराम पाटील

त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन केला. त्यांनी उद्धव शेळके यांच्या कादंबरीवर आधारित ‘पोहा चाल्ला महादेवा’ या नाटकाने रंगभूमी गाजवली. या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक हा पुरस्कार मिळालाच त्यासोबतच त्यांना मैफिलीचा माणूस हे नाव देखील मिळाले. ते कलाकार, नाटक दिगदर्शक तसेच सतार वादक देखील होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.