Crime News : क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने एकाची 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  क्रिप्टो करन्सी द्वारे नफ्याचे आमिष दाखवून एका नागरिकाला 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा चार ते रात्री साडे नऊ या कालावधीत मारुंजी येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

अभिषेक कमलकुमार माथूर (वय 43 रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 996228789123 या मोबाईल क्रमांक धारकावर, तसेच http://cryptooo0.com हा वेबसाईट धारक तसेच @RSHIVVANI123 व@KAVIIN19601 या आय.डी. नंबर धरकावर , युपीआय आयडी thakursingh480-1@okaxis shivam singh  व   dd2417@freecharge धारक व तीन बँक  खाते धारक यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Talegaon Dabhade : माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमध्ये समर्थ रामदास नवमी साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मोबाईल धारकाने फिर्यादी यांना टेलीग्राम ग्रुपमध्ये अॅड करत वरील क्रीप्टो वेबसाईटवर क्रिप्टो अकांऊट ओपन करायला सांगून वेगवेगळ्या आयडीवरून संपर्क साधत फिर्यादी यांना क्रिप्टो करन्सी साठी वेळोवेळी पैसे भरायला सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी सुमारे 14 लाख 48 हजार 900 रुपये रक्कम भरली. फिर्यादी यांच्या क्रिप्टो खात्यात 28 लाख 80 हजार असल्याचे दाखवले.

फिर्यादी यांनी ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काही केल्या पैसे निघाले नाहीत. यावेळी फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात 14 लाख 48 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्या प्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस याचा  पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.