Pimple Saudagar Crime News : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा, मॅनेजरला अटक तर पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे एज लाईन टच द ब्युटी या नावाने ( Pimple Saudagar Crime News ) सुरु असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारला  असून मिझोरामच्या तरुणीसह पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई  अनैतीक मानवी प्रतिबंध कक्ष या विभागाने बुधवारी (दि.15) रात्री कारवाई केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी शाकीर समीरुद्दीन अहमद  (वय 26 रा. मुळ आसाम) या स्पा मॅनेजर ला अटक केली असून पांडे चंकी धर्मेंद्र (वय 22 रा. काळेवाडी) व मंगेश भगवान जाधव (वय 35 रा.हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुधा अशोक टोके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News : क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने एकाची 14 लाखांची फसवणूक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पिंपळे सौदागर येथे आसपास शाळा, दवाखाने असा रहिवासी परिसर असताना देखील बेकायदेशीररित्या स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून येथील पाच पिडीतांची सुटका केली असून  या कारवाईमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, पेटीएम स्कॅनर आणि इतर साहित्य असा 11 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुधा टोके, मारुती करचुंडे, सागर सूर्यवंशी, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी केली आहे.

आरोपी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात अनेतीक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्या अतंर्गत गुन्हा ( Pimple Saudagar Crime News ) दाखल केला आहे. सांगवी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.