Pimple Saudagar : सुपर मार्केट टाकण्याच्या आमिषाने 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट टाकण्याच्या बहाण्याने (Pimple Saudagar) सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची 36 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

दीपक भानुदास घोरपडे (वय 48, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश कुमार त्यागी (रा. उत्तर प्रदेश), मोहम्मद फैजान खान (रा. दुबई), सचिन रामचंद्र सूर्यवंशी (रा. सातारा), संतोष राजाराम पवार (रा. मुंबई), अनिल काशीराम जाधव (रा. मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : टास्कच्या बहाण्याने महिलेची चार लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन कंपनीचे संचालक (Pimple Saudagar) असल्याचे भासवून फिर्यादी यांना सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट सुरु करण्यासाठी वेगवेगळे प्लान सांगितले. 35 महिने एक लाख रुपये आणि त्यांनतर 30 महिने 60 हजार रुपये तसेच विक्रीच्या पाच टक्के परतावा असे आमिष दाखवून फिर्यादीकडून 36 लाख रुपये घेतले.

त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.