Talegaon Dabhade : टास्कच्या बहाण्याने महिलेची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – घर बसल्या काम करण्याची संधी असल्याचे सांगत वेगवेगळे टास्क देत महिलेकडून पैसे घेत महिलेची तीन लाख 98 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 ते 18 जुलै या कालावधीत तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 16 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या फेसबुकवर वर्क फ्रॉम होम करण्याबाबत मेसेज आला. फिर्यादी यांना कामाची गरज असल्याने त्यांनी त्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीसोबत टेलिग्रामवर संपर्क करून त्यांना लिंक द्वारे वेगवेगळे टास्क दिले.

Sangvi : सांगवीत डॉक्टरची 27 लाखांची फसवणूक

फिर्यादी यांनी टास्क पूर्ण करण्यासाठी रक्कम भरली. मात्र, त्यांना (Talegaon Dabhade) त्याचा मोबदला न मिळता त्यांची तीन लाख 98 हजार 250 रुपयांची फसवणूक झाली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.