Pimple Saudagar : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका पादचारी वृद्ध व्यक्तीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना 25 सप्टेंबर रोजी गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली. याप्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगनारायण हरिहर भगत (वय 80) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव (Pimple Saudagar) आहे. याप्रकरणी राकेश योग नारायण भगत (वय 40) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील हे 25 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोविंद गार्डन येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना एका भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.