Khed : जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेची खरेदी झालेली (Khed) असताना त्या जागेच्या कागदपत्रांवर नावे लाऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली. त्यानंतर जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 एप्रिल ते 29 सप्टेंबर या कालावधीत खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

अजय शिवाजी जाधव (वय 34, रा. पुणे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिला, राहुल हनुमंत शेलार, भरत एकनाथ कानपिळे, पंकज भरत कानपिळे, प्रशांत भरत कानपिळे, चंद्रकांत राशे आणि अन्य साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या कंपनीच्या नावे आरोपी महिला आणि राहुल शेलार यांचे नातेवाईक भिका नाना लोंढे यांच्याकडून खराबवाडी येथील एक हेक्टर 60 गुंठे जमीन खरेदी केली.

Alandi : श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त आळंदीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

त्याची खरेदी झाल्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांची नावे जागेच्या सात बारा सदर शासकीय यंत्रणेची (Khed) दिशाभूल करून लाऊन घेतली. त्याआधारे ती जमीन भरत कानपिळे, पंकज कानपिळे आणि प्रशांत कानपिळे यांना विकली. आरोपी चंद्रकांत राशे याने इतर आरोपींना सोबत घेऊन जेसीबी घेऊन जागेत अनधिकृतपणे प्रवेश करून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.