Pimpri : आयफोन खरेदीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयफोन खरेदी करून (Pimpri )देतो असे सांगून पाच लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी येथे घडली.

जगदीश नथुराम आसवाणी (वय 45, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेहमान अब्दुल जब्बर (रा. चेन्नई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना पाच आयफोन खरेदी करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. आरोपीने फिर्यादीच्या नावावर आयफोन खरेदी केले.

Alandi : श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त आळंदीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मात्र ते त्यांना न पाठवता कुरिअरमध्ये गहाळ झाले असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर दोन दिवसात, चार दिवसात देतो, (Pimpri ) मोबाईलची रक्कम परत पाठवतो, नवीन मोबाईल घेऊन देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.