Alandi : श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त आळंदीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज : आज श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान (Alandi ) तर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले. तसेच माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण समिती द्वारा आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी तीर्थ महोत्सव 2023 या कार्यक्रमांचे 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रमात ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन याचे आयोजन करण्यात आले असून 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Pune : स्वच्छता पंधरवडा निमित्त भारती विद्यापीठाकडून स्वच्छता मोहीम

तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज ध्यान मंदिरात श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त स्वकाम सेवेने आज एक माळ जपासाठीचे आयोजन (Alandi) केले आहे. ज्ञानेश्वरी जयंती निमित्त त्यांनी प्रसादाचे वाटप केले.

श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, श्री गुरुदेव वारकरी शिक्षण संस्था, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठाण, पसायदान गुरुकुल, श्री आळंदी सेवा धाम समिती इ.सेवाभावी संस्थेच्या वतीने आळंदी शहरात श्री ग्रंथराज ग्रंथ दिंडीने हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा केली. गोपळपुरातील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सुद्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.