Pune : स्वच्छता पंधरवडा निमित्त भारती विद्यापीठाकडून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी (Pune) यांच्या जयंती निमित्त स्वच्छता पंधरवडा निमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत भारती विद्यापीठ इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) तर्फे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.

यावेळी स्वच्छता आणि श्रमदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आय एम इ डी चे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे, पीसीपीचे प्राचार्य आत्माराम पवार, वाय. एम. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे, विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उज्ज्वला बेंडाळे, आयएमइडीचे उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक तसेच एरंडवणे कॅम्पसचे सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक, सेवक वर्ग, विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Alandi : राजगुरुनगरमध्ये ब्राम्हण सभेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ .विश्वजीत कदम , कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांची प्रेरणा (Pune) तसेच भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या संचालक डॉ.अस्मिता जगताप यांचे मार्गदर्शन आयएमईडी ला लाभले. स्वच्छता आणि सेवेचे उपक्रम यापुढेही चालू राहतील’, असे उद्गार आय एम ई डी चे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे यांनी यावेळी बोलताना काढले.

चंद्रकांत पाटील यांनी या स्वच्छता अभियानाबद्दल भारती विद्यापीठाचे कौतुक केले. 1 ऑक्टोबर 2023 रोजी भिडे पुलाजवळील नदीपात्रात हा स्वच्छता, श्रमदान उपक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.