Talegaon : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Talegaon) एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून साडेतीन किलो पेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) दुपारी सव्वातीन वाजता तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

विशाल वसंत पलंगे (वय 43, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुनील शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथे एकजण गांजा घेऊन आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत विशाल पलंगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 90 हजारांचा 3.600 किलो गांजा आणि 15 हजारांचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

Alandi : राजगुरुनगरमध्ये ब्राम्हण सभेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे

हा गांजा विशाल याने सुनील याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे सुनील शिंदे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल (Talegaon) करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.