Hadapsar :पठ्ठ्याने टिकावाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या एका पठ्ठ्याने (Hadapsar) हडपसर परिसरात जाऊन एसबीआय बँकेचे एटीएम चक्क टिकावाने फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या नियंत्रण कक्षातून पुणे पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

विक्रमलाल इंद्रलाल शहा (वय 28, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. उत्तराखंड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी एसबीआय बँकेच्या नियंत्रण कक्षातून हडपसर पोलिसांना माहिती मिळाली. हांडेवाडी हडपसर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एक व्यक्ती मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत असून त्याच्या हालचाली संशयित आहेत.

Pune: वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘पुणे पुस्तक परिक्रमा’

त्यानुसार हडपसर पोलिसांनी हांडेवाडी येथे धाव घेतली. त्यावेळी एक व्यक्ती एटीएम सेंटर मधून पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो एटीएम मधून पैसे चोरी (Hadapsar) करण्यासाठी आला असल्याचे त्याने सांगितले. त्याने एटीएम मशीनचा पत्रा उचकटला होता. त्याच्याकडून टिकाव जप्त करण्यात आला आहे. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.