Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (Nigdi)या संस्थेतर्फे सावरकरांच्या आत्मार्पण दिनी दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा’ संपन्न झाला. पुरस्काराचे यंदा 16 वे वर्ष होते. शुभान फाउंडेशन, मिझोराम या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार तर  कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेला स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, शुभान फाउंडेशनचे (Nigdi)डॉ. सुभाशिस नंदी, डॉ. वेदमणी देवी, स्वयंसिद्धा संस्थेचे तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड, प्रिया भुयेकर, आशा थोरवत, पद्मश्री तेरदाळे, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सावरकर प्रेमी व शहरातील विविध संस्थांचे मान्यवर, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, मंडळाच्या सर्व विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुटीरतावाद आणि धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलेल्या मिझोराम राज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी शुभान फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. राज्याचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन तिथे शेती, अन्न प्रक्रिया, फलोत्पादन, हस्तकला यांच्या माध्यमातून स्थानिकांना हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या शुभान फाउंडेशन, मिझोराम या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मागील तीन दशकाहून अधिक काळ कोल्हापूर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, व्यक्तिमत्व विकसन, महिलांवरील अन्याय निवारण व सबलीकरण तसेच आरोग्य विषयक कार्य करीत महिला, महिला नव उद्योजकासाठी काम करणाऱ्या आणि महिलांच्या व्यवसाय वाढीचे एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणून नावारूपाला आलेल्या, महिला सक्षमीकरणांमध्ये संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेला स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 51 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Pune: वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘पुणे पुस्तक परिक्रमा’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजही सर्वांसाठी पथदर्शक आहेत. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची ज्वाला भारतीयांमध्ये निर्माण केली. त्यामुळे त्यांचे विचार आणि तत्वज्ञान हे सदैव भारतीयांना चेतना देत राहील. सावरकरांनी देशाला बळकट करण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून भारत बलशाली झाला आहे, असे सुनील  देवधर म्हणाले.

पारितोषिक वितरणाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुराष्ट्र दर्शन’ या दोन पुन:र्मुद्रित पुस्तकांचे प्रकाशन सूनील देवधर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सात्यकी सावरकर यांनी या प्रसंगी या दोन्ही पुस्तकांची ओळख सर्वाँना करून दिली.

प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव सागर पाटील यांनी केले, सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले. आभार सहसचिव राजेंद्र देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता अमृता दाते यांनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरमने करण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.