Pimpri: संतपीठ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मध्ये 27 फेब्रुवारी (Pimpri)प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस27 फेब्रुवारी हा दिवस राजभाषा दिनम्हणजेच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्यावसायिक रविकुमार पाटील, संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे ,(Pimpri) संचालिका डॉ. स्वाती मुळे, संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार व समन्वयिका मयूरीमुळुक, अनिरुद्ध मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने झाली. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन शोभा शिर्के यानी केली.

पहिल्याच्या व दुसरीच्या वि‌द्यार्थ्यांनी गणपतवाणी या मराठी बालकवितेचे सादरीकरण केले व इयत्ता तिसरीच्या व पाचवीच्या विद‌यार्थीनींनी भाषण केले.

Hadapsar :पठ्ठ्याने टिकावाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कवी कुसुमाग्रजांविषयी माहिती संतपीठ मधील शिक्षिका ज्योती लोखंडे यांनी दिली. तिसरीव सातवीच्या विद्यार्थ्यांनी ही कर्मभूमी ही मायभूमी, हे समूहगीत
सादर केले. संतसाहित्य आणि मराठीची सद्यस्थिती याविषयी मंगल आंबरेयांनी माहिती दिली.

इयत्ता तिसरीच्या विद्‌यार्थ्यांनी मी मराठी या नृत्याचे सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे तसेच प्रमुख अतिथी श्री. रवि पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका शोभा शिर्के यांनी सर्वांचे आभार प्रर्दशन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.