Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे किराणा दुकानाचे शटर उचकटून दिड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे चोरट्यांनी एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (दि.2) पहाटे साडेतीन ते चार या अर्धा तासाच्या कालावधीत घडला.

याप्रकऱणी अचलरामजी गोमारामजी चौधरी (वय 42, रा.पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : प्रदीप कुरुलकर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; एटीएस कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे सौदागर येथे न्यु बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटून (Pimple Saudagar) दुकानाच्या गल्ल्यातील रोख 1 लाख 53 हजार व कामगाराचा दोन हजाराचा मोबाईल असा एकूण 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुचाकीवरून पसार झाले आहेत.

यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.