PCMC : महापालिका शहरातील महिला बचत गटांचे करणार सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) सर्व महिला बचत गटांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करुन दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची (पीएमयू) निर्मिती केली आहे. टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट या खासगी संस्थेमार्फत तीन वर्षे चालविल्या जाणाऱ्या या कक्षासाठी सुमारे आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शहरातील बचत गटांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी महापालिकेकडून अनुदान दिले जाते. शहरात महिला बचत गटांची संख्या अधिक आहे. दिव्यांग, तृतीयपंथीय तसेच, करोनामध्ये विधवा झालेल्या महिलांचेही कोविड योद्धा महिला बचत गट स्थापन केले आहेत.

बचत गटातील महिलांची क्षमता विकसित करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, उद्योग विकास घडवून आणणे, रोजगारांच्या संधी आणि बाजारपेठ यांची सांगड घालण्यावर भर दिला जाईल. तसेच, संस्थात्मक बांधणी, आर्थिक साक्षरता या माध्यमातून बचत गटांचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी या कक्षाची स्थापना करणार आहे.

या कक्षाचे कामकाज करण्यासाठी 24 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2022 या एका महिन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानंतर मध्यवर्ती भांडार विभागाकडून निविदा काढण्यात आली. त्यात टाटा कम्युनिटी इनिशिटिव्हज ट्रस्ट आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हन्मेंट अशा दोन खासगी संस्थांचा प्रतिसाद लाभला.

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे किराणा दुकानाचे शटर उचकटून दिड लाखांची चोरी

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त आणि अधिकाऱ्यांसमोर दोन्ही संस्थांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी (PCMC) सादरीकरण केले. यामध्ये टाटा कम्युनिटीने कक्षाच्या तीन वर्षाच्या कामासाठी एकूण 13 कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे महापालिकेस कळविले.

दर कमी करण्यास सांगितल्यावर संस्थेने तीन वर्षांसाठी जीएसटी कर वगळून 7 कोटी 68 लाख 59 हजार 706 इतक्‍या खर्चात काम करण्याची तयारी दर्शवली. या खर्चास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. हा खर्च समाज विकास विभागाच्या महिला बचत गटांसाठी मिशन स्वावलंबन या उपलेखाशीर्षाच्या तरतुदीतून करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.