Talegaon Dabhade : रोटरीच्या रक्तदान शिबिरात 150 पिशव्यांचे रक्त संकलन

एमपीसी न्यूज – रोटरी वर्षाची सुरुवात 1 जुलै रोजी ( Talegaon Dabhade) झाली. यानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात 150 जणांनी रक्तदान केले.

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले, सचिव श्रीशैल मेंथे, प्रकल्प प्रमुख डॉ. ज्योती मुंडर्गी, माजी अध्यक्ष महेश महाजन, यादव खळदे, विलास जाधव, मंगेश गारोळे, भालचंद्र लेले, विश्वनाथ मराठे, आनंद असवले, फर्स्ट लेडी अर्चना चितळे,शंकर जाधव,अनिश होले,अरुण बारटक्के,शशांक ओगले,धनंजय मथुरे,प्रसाद मुंगी,संदीप जोशी,तुषार अल्हाट,संजय अडसूळ,प्रमोद दाभाडे,विकास उभे,निता काळोखे,दिपा कुलकर्णी व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या ( Talegaon Dabhade) वतीने नवीन रोटरी वर्षाची सुरुवात 1 जुलै रोजी पॉस्को कंपनीच्या आवारात गरवारे ब्लड बँक व पॉस्को कंपनी यांच्या सहकार्याने तसेच पिंपरी सेरोलॉगिकल लॅब (विकास बनसोडे) व शंकर महाराज सेवा केंद्र (अविनाश वैद्य) यांच्या सहकार्याने लायन्स क्लब हॉल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या वेळी 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

PCMC : महापालिका शहरातील महिला बचत गटांचे करणार सर्वेक्षण

प्रास्ताविक डॉ. मुंडर्गी यांनी केले, गरवारे ब्लड बँकचे राहुल पारगे, डॉ. पोवार, तसेच पी एस एलचे विकास बनसोडे व शंकर महाराज सेवा केंद्रचे अविनाश वैद्य यांचे सहकार्य लाभले. आभार कमलेश कार्ले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.