Moshi : शस्त्रासह वावरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज : शस्त्रासह परिसरात वावरणाऱ्या (Moshi) तडीपार गुंडाला गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.

करण कुमार जाधव (वय 26, रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोशी भोसरी येथे एका तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक केली आहे. आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते.

Talegaon Dabhade : रोटरीच्या रक्तदान शिबिरात 150 पिशव्यांचे रक्त संकलन

तरीही आरोपीने आदेशाचा भंग करत तो आयुक्तालया हद्दीत आला शिवाय त्याच्याकडे शस्त्र आढळल्याने त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.