Pune News : चौथे गांधी दर्शन शिबिराचे पुण्यात आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (Pune News) आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय  ‘गांधी दर्शन शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 9 जुलै रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत हे शिबीर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होईल.  गांधी दर्शन शिबिर मालिकेतील हे चौथे शिबीर आहे.

या शिबिरात ज्येष्ठ लेखक अशोककुमार पांडेय हे ‘राष्ट्रपिता म्हणून गांधीजींचे स्थान, प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे हे गांधी-आंबेडकर आणि देशाचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन करतील.

महाराष्ट्र (Pune News) गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर मार्गदर्शन करतील. नावनोंदणीसाठी https://forms.gle/Jpnw4kbw5MthAPtM7 हा गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.