Theur : श्रीक्षेत्र थेऊर मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र थेऊर गावामध्ये सहा महिन्यापूर्वी श्री चिंतामणी गृहनिर्माण सोसायटीमध्ये (Theur) श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावर्षी 10 एप्रिल  रोजी पहिला प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या थाटामाटात प्रकट दिन साजरा करण्यात आला.

पहाटे 6 वाजता श्री स्वामी समर्थ मूर्तीचा अभिषेक करण्यात आला तर  ठिक 7 वाजता श्रींची आरती करण्यात आली “श्री याग” पूजा करण्यात आली. दुपारी साडे बारा वाजता आरती नैवेद्य दाखवण्यात आला प्रकट दिनाच्या निमित्ताने तीन ते पाच यावेळेत श्री ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांची भजन सेवा झाली.

सायंकाळी पाच ते सात या वेळेत श्रींची पालखीतून नगर प्रदक्षिणा  मिरवणूक वारकरी संप्रदाय टाळ मृदंग अभंग स्वामींच्या भजन जयघोषात व आनंदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.विविध ठिकाणी पालखीचे स्वागत केले.  श्री चिंतामणी गणपती मंदिरात (Theur) आरती व चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार व स्वागत केले. सायं श्री महाआरती मा. तात्यासाहेब रामचंद्र काळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार संघ यांच्या हस्ते झाली.

Chinchwad : स्वामी समर्थ प्रकटदिनी खासदार बारणे यांनी साधला स्वामीभक्तांशी संवाद

यावेळी चिंतामणी गृहनिर्माण सोसायटीतील नागरिक,गावातील अनेक मान्यवर मंडळी, लहान मुल- मुली  व महिला भगिनींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

जवळजवळ 1500 स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला.यावेळी तात्यासाहेब काळे, विश्वनाथआण्णा तांबे,केशव काका विध्वंस,गणेश काळे,अक्षय बधे,विशाल तांबे,दिलीप आहेर,शंतनू गोगावले,सुजित काळे,नितीन शितोळे,स्वप्निल कोतवाल,आकाश बधे,राजेंद्र काळे,अभिषेक शितोळे,नंदू अविनाशे,सुमित कुंजीर,दादा गोयगुडे,उमेशकाका सरोदेमामा,शितोळे बापु,विजय काळे,कोतवालसाहेब,कुलकर्णी काका,शरद पुजारी संजय सोनवणे,लालाशेठ गुप्ता,श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते अशी माहिती आनंद महाराज तांबे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.