Pune : पुण्यात मंडईजवळील स्वामी समर्थ मठातर्फे स्वामी प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – फुलांनी सजविलेल्या पालखीतून श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुकांची मिरवणूक (Pune) उत्साहात काढण्यात आली. मंडई परिसरातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठ (Pune) तर्फे या प्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये स्वामींच्या मूर्तीला पोशाख, दागिने आणि गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली.

मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठच्या श्री स्वामी समर्थ मठात स्वामी प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष गजानन जेधे, कोषाध्यक्ष संदीप होनराव, विश्वस्त रविंद्र शेडगे, विक्रम आगाशे, श्रीराम पुरंदरे, डॉ.अमित वाडदेकर यांसह कार्यकर्ते व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

         

Pimpri-chinchwad : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवानिमित्त भाविक भक्ती रसात तल्लीन

कमलेश कामठे म्हणाले, स्वामी प्रकट दिनानिमित्त बुधवारी पहाटे ३ वाजता श्रींचा लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांचे प्रकट दिनाचे कीर्तन झाले.

श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, रामेश्वर चौक, शनिपार, निंबाळकर तालीम, खुन्या मुरलीधर मंदिर, चित्रशाळा चौक, मोदी गणपती, ओंकारेश्वर, शनिवारवाडा, देसाई महाविद्यालय, छत्रपती शिवाजी रस्ता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, दत्तमंदिर मार्गे श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान येथे मिरवणुकीचा समारोप झाला. यामध्ये भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.